देवरुख:-चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वैदेही सावंत, सुप्रिया मंडलिक यांनी नुकताच अभ्यास दौरा संपन्न केला यामध्ये त्यांनी स्नेहालय, राळेगणसिद्धी, हिवरेबाजार तसेच नाफारी पुणे कडून अन्नभेसळ संदर्भातील एक दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केले.
स्नेहालय संस्थेच्या वतीने राज्यातील 50 सामाजिक संस्थांची सेवा संवर्धन कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेला चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वैदेही सावंत यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सदर कार्यशाळेत समविचारी संस्था एकत्र येऊन एका विचाराने काम करतील तेव्हा मोठे कार्य घडेल असे प्रतिपादन डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी केले. शशिकांत सातभाई, मिलिंद कुलकर्णी ,अनिल गावडे,रीमा अमरापूरकर, रमेश जारे, हर्ष घाटे आधी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले.रत्ना शिंदे, स्वप्नील मोकळ, स्नेहालय UK CEO जॉईस कोरोनी, भिंगारदिवे,अनिल जगताप यांनीही उपस्थित संस्थांना सहकार्य केले.
अहिल्यानगर रेडिओ नगर आकाशवाणीच्या चिन्मय मॅडमनी वैदही सावंत यांची मुलाखत घेतली. त्यात स्नेहालय संस्थेचे काम डोळ्याला दिपवून टाकणारे असून माणुसकीचे उत्तम दर्शन घडवणारी सर्व संस्थासाठी आदर्शवत संस्था आहे. ज्ञानाच्या खजान्याबरोबर माणुसकीचा खजाना स्नेहालयमध्ये आहे असे उदगार संस्थेच्या वैदेही सावंत यांनी काढले.सामाजिक बांधिलकी जपत कोणतही मानधन नसताना केवळ आपल्या शिक्षणाचा, ज्ञान व कौशल्याचा उपयोग देशसेवेसाठी व्हावा यां इच्छेने आपण समाजात काम करत आहोत तसेच स्नेहालयचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून करत राहणार असल्याचे सांगितले.
मा.पोपटराव पवारांचे हिवरेबाजार आणि मा.अण्णा हजारांचे राळेगणसिद्धी या आदर्श गावाला भेट दिली . शरद पवार यांच्या कृषी धोरणांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर पीएचडी पूर्ण करणारे आणि आदर्श गाव योजनेचा आदर्श गावे निर्मितीमध्ये पडलेला प्रभाव!यांचा अभ्यास करणे आणि महाराष्ट्रातील योजनांच्या धोरणांचा अभ्यास करणे या पोस्ट डॉक्टरेट फेलो ICSSR या पुढील शिक्षणासाठी अभ्यास करत असलेले डॉ.प्रकाश तांबे हे सुद्धा या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते संस्थेच्या वैदेही सावंत या स्वतः यशदाच्या स्टेट मास्टर ट्रेनर असल्याने व 2015 पासून सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,बीडीओ आदी प्रशासकीय अधिकारी यांना प्रशिक्षण दिले असल्याने संस्थेचे डॉ. प्रकाश तांबे यांनी या अभ्यास दौऱ्यात सहभागी होणे उचित समजले. आदर्श गावासंदर्भात चर्चा व अभ्यास करण्यासाठी हिवरे बाजार गावाची पूर्ण पाहणी करून तेथील पाणी, पीक,सप्तसूत्रीचे पालन तसेच आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग सेंटर यांना भेटी देऊन तेथे काही नोंदी घेतल्या गेल्या.
नंतर राळेगणसिद्धीला गेल्यानंतर अण्णा हजारेंची भेट घेतली. संस्थेच्या वैदेही सावंत व सुप्रिया मंडलिक यांनी गावाचा विकास महिला,बालक या संदर्भातील अण्णांची भूमिका यावर सकस चर्चा केली.
अण्णांनी महिलांनी धाडस दाखवले पाहिजे त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्यावर उपाययोजना शासनाला सूचिविल्या पाहिजे असे सांगितले तसेच तेथील दाल मिल प्रकल्प शेंगदाणा, कुरडई इत्यादी तेल काढण्याचे प्रकल्प आधी पाहणी करून त्यावर चर्चा करण्यात आली.
अण्णांनी चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्थेचे काम जाणून घेऊन महिलांवरील प्रश्नांवर विशेषतः विधवा महिलांना समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी संस्था करत असलेल्या तसेच बालकांसाठी राबवत असलेल्या जीवन कौशल्य कार्यशाळा या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. इथून पुढे अजून कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या व आमचे सहकार्य नेहमी आपल्याला लाभेल असे आश्वासन दिले.
स्नेहालय, हिवरेबाजार, राळेगणसिद्धी आणि नाफारी पुणे येथील सर्व माहिती, अभ्यास, सूक्ष्म नोंदी या नक्की चक्रभेदी संस्थेला पुढील वाटचाल करण्यासाठी पर्यायाने समाजासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास समाजसेविका वैदेही सावंत यांनी व्यक्त केला आहे तसेच संस्थेला कोठूनही निधी नसल्याने मोठया मनाच्या, संवेदनशील व्यक्तींनी वस्तू, वेळ,कष्ट अथवा आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.