चिपळूण:- वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यातील सावर्डे, शिरगाव, अडरे आणि दादर या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आशा सेविकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ फेब्रुवारी रोजी आशा सेविकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आशा सेविका याना आरोग्य क्षेत्रातील नवनवीन बदलाबाबत, आधुनिक उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले होते.
यावेळी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी तेथील वैद्यकीय अधिकरी डॉ. वैष्णवी वानखेडे, डॉ. पूनम रानीम, एलएचव्ही के. राणे, सीएचओ पूनम घुने, सुपरवायझर एस. वाय. जानवलकर, गट प्रवर्तक पी. ए. सावंत, एस. एस. भूवर उपस्थित होते.
शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी तेथील वैद्यकीय अधिकरी डॉ. सावली पवार, सुपरवायझर श्री. अडाव, आरोग्य सहाय्यक के पी बाविस्कर, गट प्रवर्तक एस एस मोरे उपस्थित होते. अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित शिबिरासाठी तेथील वैद्यकीय अधिकरी डॉ. वाय व्ही मयेकर, डॉ. एस भिसे, डॉ. धनश्री जाधव, एलएचव्ही श्री. ए एस सावंत, श्री ए आढाव, गट प्रवर्तक श्रद्धा सुनील जाबरे, साक्षी संजय चव्हाण, एच ए आर एस जाधव, इरकर उपस्थित होते. तर दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकरी डॉ. धानवे, एमपीडब्लू श्री. व्ही. एस. वरुडे, सुपरवायझर आर एम मोलाज, गट प्रवर्तक अपूर्वा कडव उपस्थित होते. तर धन्वंतरी रुग्णालयाकडून श्वेता कदम, सायली चव्हाण आणि सृष्टी साळवी यावेळी उपस्थित होते.