भीषण आगीत कंटेनर जळून खाक
लांजा:- काल रात्री सव्वा दहा च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील वळणावर कंटेनर पलटी झाला.भीषण अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर यांना वाचविण्यात यश आले असून अपघातात दोघांना गंभीर मार लागला आहे. काहीच वेळात कंटेनर ला भीषण आग लागली.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस स्टेशन मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद कांबळे,पोलिस नितेश राणे,शिवाजी कळंत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली.भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नंदकुमार सुर्वे यांनी आपला पाण्याच्या टँकर उपलब्ध करून दिला .तसेच
महामार्ग ठेकेदार कडून टँकर उपलब्ध करून देण्यात आला तसेच राजापूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजापूर अग्निशमन दलाचे ड्रायव्हर राजू कणेरी,फायरमन अशोक गार्डी, वैभव कांबळी वाकेड पोलिस प्रशांत भितले,सरपंच संदीप सावंत, जिजाई संस्थेचे योगेश पांचाळ,महेश देवरुखकर,जयवंत जाधव,पाटील, नंदकुमार सुर्वे,राजू जाधव,मंगेश लाजेकर,मिलिंद गुरव, शिवा उकली, विवेक कनावजे यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.आगीत कंटेनर जळून खाक झाला .