राजू सागवेकर/राजापूर:- राजापूर तालुक्यातील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ जानशी संचलित साने गुरुजी विद्यामंदिरात एक अनोखा शैक्षणिक सोहळा पार पडला. वात्सल्य ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे चतुरस्त्र व हरहुन्नरी मुख्याध्यापक श्री. बाळू शिवणेकर, संस्थेचे सचिव श्री. जैतापकर सर, वात्सल्य ट्रस्टचे विश्वस्त श्री. उमर नाईक, शाळेतील जेष्ठ शिक्षिका सौ. सुतार मॅडम, जेष्ठ कला शिक्षक श्री. पवार सर, श्रीमती चाळके मॅडम, सामाजिक कार्यकर्ते श्री. भाईसाहेब कणेरी, शिक्षण क्षेत्रातील अग्रणी सौ. प्रज्ञा परांजपे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक साहित्य हातात घेताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. वात्सल्य ट्रस्टच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे नव्याने प्रेरित केले असून, हा एक आगळा-वेगळा ज्ञानदानाचा सोहळा ठरला आहे.
शिक्षणप्रेमींच्या या सामाजिक बांधिलकीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वात्सल्य ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे!