चिपळूण : आगामी रमजान सण अनुषंगाने आज चिपळूणचे उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. सदर बैठकीकरिता मुस्लिम समाजाचे कार्याध्यक्ष नाझीम अफवारे यांचेसह प्रत्येक गावातील जमातीचे अध्यक्ष असे एकूण 43 पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र कुमार राजमाने यांनी मार्गदर्शन करून खालील प्रमाणे सूचना दिल्या आहेत 1. आजानाचे वेळी लावण्यात येणाऱ्या स्पीकर साठी मा. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीशेपक संबंधी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे 2. तरावीकरिता लाऊड स्पीकर चा वापर करू नये 3. नमाजा करिता येणाऱ्या मुस्लिम बांधवांनी मशिदीचे बाहेर रस्त्यावरती अस्ताव्यस्त वाहने पार्क करू नये 4. ज्या ठिकाणी अनाधिकृत स्पीकर आहे ते स्पीकर बंद करावेत 5. काही बिल्डिंगच्या खाली नमाज पडले जातात अशा ठिकाणी ध्वनीशेपक वापरू नये 6. जो कोणी गोवंश वाहतुक करीत असेल तर पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती द्यावी 7. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे व कायद्याचे पालन करावे 8. सोशल मीडिया वरती कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्य मजकूर टाकू नये,छापू नये,प्रसारित करू नयेत. अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.