रत्नागिरी:-महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चिपळूण शाखेचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले प्राथमिक शिक्षक मौला गुलाब नदाफ, कुंदा मुलू मोरे व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद शाळा मांडकी खुर्द, तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक मिळवलेली जिल्हा परिषद शाळा बोरगाव क्र.१, द्वितीय जिल्हा परिषद शाळा कुशिवडे शिगवण आणि तृतीय जिल्हा परिषद शाळा स्वयंदेव या शाळांचा गुणगौरव सोहळा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या विशेष उपक्रमांतर्गत नासा व इस्रो या अभ्यास दौऱ्यासाठी चाळणी परीक्षा अंतर्गत उत्तीर्ण झालेले चिपळूण तालुक्यातील अनघा सचिन तांबेकर, शाळा पालवण क्र. १, सृष्टी सदानंद भुवड, शाळा तुरंबव क्र. १, श्रावणी वैभव गमरे, शाळा पेढांबे क्र. १, संग्राम प्रशांत भंडारे शाळा खेर्डी क्र. १, सोहम सुनील बारे शाळा गोंधळे क्र. १, रिया राजेश कदम शाळा कान्हे मराठी या विद्यार्थ्यांना गौरवपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. संबंधित शाळेतील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
समारंभात चिपळूण तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या शिक्षक बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा चिपळूणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंत पेढांबकर यांनी भूषविले. व्यासपीठावर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, संघटनेचे माजी राज्याध्यक्ष व सल्लागार विनायक घटे, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष वसंतराव मोकल, रत्नागिरी जिल्हा सल्लागार सुरेश साळवी, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, पतपेढीचे माजी संचालक व शिक्षक संघाचे पदाधिकारी अजय गराटे, माजी संचालक अनंत कदम, चिपळूण तालुका शिक्षण सल्लागार समिती सदस्य सतीश सावर्डेकर, उर्दू शिक्षक नेते झिया खान, शिक्षक संघाचे राजेंद्र महाडिक,अविनाश भंडारी, मुख्याध्यापक संघटनेचे संजय सोनवणे, अफ्रोट संघटनेचे लुकमान तडवी, सती हायस्कूलचे कलाशिक्षक टी. एस. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सिताराम शिंदे गुरुजी, शिक्षण विस्तार अधिकारी व संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत त्रिभुवने, जिल्हा नेते प्रदीप पवार, शिक्षक संघाचे प्रकाश ऊर्फ आशू गांधी, पुरोगामी लांजा तालुका अध्यक्ष नितीन कोलते, संतोष शिंदे, दिव्यांग संघटनेचे रवींद्र घाणेकर तसेच कोल्हापूर व रायगड जिल्ह्यातील पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित कलाशिक्षक टी. एस. पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून शरदचंद्र पवार राज्य फेलोशिप मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. पुरोगामी संघटनेच्या या सोहळ्यासाठी रत्नागिरीतून विशेष उपस्थिती दर्शवलेल्या फक्रुद्दीन कोतवडेकर यांचाही सन्मान करण्यात आला.