रत्नागिरी:- भारतीय ज्ञानपरंपरा या विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा रत्नागिरीत आयोजित करण्यात आली आहे.केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ मार्च या काळात ही कार्यशाळा सकाळी ११ ते सायंकाळी साडेचार या वेळेत होणार आहे.
कार्यशाळा निःशुल्क असून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेदरम्यान तीन दिवस दुपारच्या भोजनाची व्यवस्था आयोजकांमार्फत करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या रत्नागिरी उपकेंद्रात ही कार्यशाळा होणार असून कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.
नावनोंदणीसाठी लिंक – https://forms.gle/9VBtyhi2X5ehTwos8