पुणे : पुणे स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (37) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी दोन दिवसांपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी तब्बल 13 विशेष पथके तयार केली होती. अखेर गुरुवारी रात्री उशिरा शिरूर तालुक्यातील एका गावातून त्याला अटक करण्यात आली.
काल (शुक्रवार) आरोपीला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीचे वकिलपत्र वाजिद खान बिडकर यांनी घेतले. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आहे. यापूर्वीही त्याच्यावर चोरी, दरोडा आणि चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केला. मित्राच्या सांगण्यावरून पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली