रत्नागिरी : खेडशी येथील माहेर संस्थेत पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या प्रौढाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विलास लक्ष्मण पवार (वय ५२, पत्ता माहीत नाही) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) च्या मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवार हे ३१ मे २०१८ पासून खेडशी येथील माहेर संस्थेत पुनर्वसनासाठी दाखल होते. बुधवारी त्यांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.