चिपळूण : चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकातून सुटलेली मंडणगड – रत्नागिरी ही बस ब्रेक न लागल्याने गुहागरच्या दिशेने गटारात गेली. सुदैवाने यामध्ये समोरून जाणारा दुचाकीस्वार वाचल्याने अनर्थ टळला. ही घटना गुरूवारी २७ रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
चिपळूण आगारातून सुटलेली मंडणगड आगाराची मंडणगड-रत्नागिरी ही एस.टी. बस रत्नागिरीकडे निघण्यासाठी सुटली. याचवेळी ब्रेक न लागल्याने ही गाडी हॉटेलसमोरील गटारामध्ये गेली. याचवेळी एक दुचाकीस्वार समोरून येत होता. सुदैवाने तो या अपघातातून बचावला. या ठिकाणी अनेक दुचाकीदेखील उभ्या असतात. मात्र, सकाळच्यावेळी दुचाकी नसल्याने मोठे नुकसान टळले. मध्यवर्ती एसटी स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणावर टपऱ्यांचे साम्राज्य आहे. पालिकेने गुरूवारच्या दिवशी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला होता. सकाळी काम सुरू झाले त्याचवेळी हा अपघात घडला आणि मोहिमेला आणखीनच जोर आला.