रत्नागिरी:-अज्ञात कारणातून भररस्त्यात पत्नीला शिवीगाळ करत बिअरची बाटली डोक्यात मारुन दुखापत केली. याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वा.सुमारास टिआरपी ते अतुलीत बलधाम येथून शांतीनगर जाणार्या पायवाटेवर घडली.प्रशांत कृष्णा गमरे (39, रा. बुरंबाड संगमेश्वर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी त्या टीआरपी येथे हसमुख पटेल यांच्याकडील घरकाम करुन टीआरपी ते अतुलित बलधाम येथून शांतीनगर जाणार्या पायवाटेने चालत घरी जात होत्या. तेव्हा तिचा पती प्रशांत हा एका पिशवित बिअरच्या बाटल्या घेउन तिथे आला.
त्यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन हातातील पिशवीमधून बिअरची बाटली काढून तिच्या डोक्यात फोडून दुखापत केली.