‘नंदीदेव बकासूर बैलाची, खास एंट्री
अजित गोसावी / लांजा
विवली-केळंबे स्पोर्टस् क्लब आयोजित विवली येथे २ मार्च रोजी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ‘ नंदिदेव बकासुराची एंट्री ,हे खास आकर्षण ठरणार आहे.
तालुक्यातील विवली आंबा बस स्टॉप नजिक खानविलकर मैदान येथे ही स्पर्धा रविवारी २ मार्च रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धे संदर्भात अधिक माहितीसाठी 9860228709, 9860925005, 7498612808, 7972492830 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन विवली-केळंबे स्पोर्टस् क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.