चिपळूण:-शहरातील बहाद्दूरशेख नाका एसटी थांबा येथे इतर वाहतुकीस अडथळा होईल, अशी वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांवर चिपळूण पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. हसन कासिम सय्यद (35, पोफळी), हिमतुल्ला अजमुद्दीन भेलेकर (39, नांदिवसे) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद अशोक कृष्णा शिंगाडे, गणेश भागवत नाळे यांनी दिली.