तुटपुंजा मानधनामुळे नाराजी
रत्नागिरी:-राज्य शासनाकडून नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षणसेवकांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आह़े. यामुळे कुटुंबाचा गाडा चालविणे अवघड झाले आह़े. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षणसेवक पद रद्द करावे अशी मागणी कंत्राटी शिक्षक कर्मचारी संघटनेचे जावेद तांबोळी यांनी केल़ी.
शासकीय विश्रामगृह माळनाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत तांबोळी बोलत होत़े. राज्य शासनाने 21 हजार पेक्षा अधिक पदे भरुन शाळेला व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिल़े. मागील अनेक वर्ष नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरी मिळाली. मात्र शासनाकडून तीन वर्ष शिक्षणसेवक पदावर केवळ 16 हजार रुपयांत काम करायला लावणे हे अन्यायकारक आह़े. विविध परीक्षा देवून शिक्षक म्हणून सेवेत आलेल्या तरुणांना तीन वर्षे प्रोबेशन कालावधीत ठेवणे महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याला अशोभनीय असल्याचे तांबोळी यांनी सांगितल़े.
शिक्षणसेवकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिक्षणसेवक हा अन्यायकारक कालावधी रद्द करण्यात यावा, जर तो रद्द करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास विलंब होत असल्यास त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत कराव़ी. या समितीचा अहवाल येईपर्यंत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवून किमान कालावधी कराव़ा. या मागण्यासांठी शिक्षकांनी दोन कृती कार्यक्रम हाती घेतले असून त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हावार पत्रकार परिषद घेऊन शिक्षण सेवकांच्या व्यथा मांडणे, त्यानंतर राज्यस्तरीय शिक्षणसेवकांची शिक्षण परिषद आयोजित करुन त्याठिकाणी शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षणराज्यमंत्री प्रशांत भोयर व इतर लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणार असल्याचे तांबोळी यांनी यावेळी सांगितल़े.