चिपळूण:-आजारपणाला कंटाळलेल्या 74 वर्षीय वृद्धाने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना नायशी-नारळीवाडी येथे सोमवारी घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
सुभाष लक्ष्मण घाग (74, नायशी नारळीवाडी) असे आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे. सुभाष घाग यांना रक्तदाब व फुफ्फुसाचा आजार होता. या आजारपणाला कंटाळून तसेच वयोवृद्ध असल्याने त्यांनी राहत्या घरी स्वत:ला जाळून घेतले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.