खेड:-तालुक्यातील धामणंद-गावठण येथे दारूच्या नशेत पत्नी व सुनेला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत असताना समजावण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या डोक्यात चुलीजवळील दांडक्याने मारहाण करत जखमी केले. या प्रकरणी राहुल राजाराम खैर (32) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनाकारण आम्हाला शिव्या देवू नकोस, असा फिर्यादी बोलल्या राग मनात धरून संशयिताने महिलेल्या डोक्यात दोनवेळा दांडक्याचे फटके मारून दुखापत केली. यानंतर फिर्यादी जमिनीवर पडल्यावरही मारहाण करत दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी उशिरा संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.