राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर सादरीकरण
चिपळूण : भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यशस्वी होत शिमला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भावी सनदी अधिकाऱ्यानी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विशेष निमंत्रणास अनुसरुन राष्ट्रपती भवनास भेट देत प्रशिक्षणाबाबत सादरीकरण केले. यामध्ये तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे गावचे सुपुत्र आयआरएस कॅडर समर्थ अविनाश शिंदे याने आपल्या प्रशिक्षणाबाबत प्रभावीपणे आणि आत्मविश्वासाने माहिती दिली. या माध्यमातून राष्ट्रपती भवनात कोकणचा आवाज पोचवला.
भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यशस्वी होत शिमला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भावी सनदी अधिकाऱ्यानी यावेळी प्रशिक्षणाबाबत सादरीकरण केले. यामध्ये दसपटी विभागातील कळकवणेचे सुपुत्र आयआरएस कॅडर समर्थ शिंदे यांनी प्रशिक्षणातील अनेक पैलू उलगडले. कोकणातील चिपळूण-दसपटी येथील 2024च्या बॅचमधील आयआरएसचा कॅडर अविनाशराव शिंदे यास यामध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
समर्थ शिंदे याने आपल्या प्रशिक्षणाबाबत प्रभावीपणे व आत्मविश्वासाने माहिती दिली. चाणक्य मंडळच्या मुशीत घडलेल्या समर्थ शिंदेवर अविनाश धर्माधिकारी यांचे संस्कार असून संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास ही कौशल्ये त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच घोटवली. समर्थच्या या कामगिरीने देशातील अव्वल कॅडरमध्ये कोकणातील कर्तृत्वाचा ठसा उमटत असून येथील विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरेल.