अलोरे वरीवाडीतील प्रकार, दोन लाकडाच्या खोपट्याही आगीच्या भक्ष्यस्थानी
चिपळूण:-परशुराम घाटात रविवारी वणवा लागलेला असताना सोमवारी अलोरे वरीवाडी येथे लागलेल्या भीषण वणव्यात कातकरी टेप येथील दोन खोपटी, वणवा विझवण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकी जळून खाक झाली. आंबा बागेचे ही नुकसान झाले आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी कराड मार्गावर सती येथील डोंगरातही वणवा लागला. दोन्ही आगीच्या ठिकाणी चिपळूण नगर पालिकेच्या अग्निशमन बंबाने धाव घेत हा वणवा आटोक्यात आणला.
उन्हाळा अधिक तीव्रपणे जाणवू लागलेला असताना आता वणवा लागण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. यापूर्वी परशुराम, वालोपे, दळवटणे येथे लागलेल्या वणव्यी पुनरावृत्ती रविवारी परशुराम घाटात घडली. तेथील वणवा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने विझवलेला असताना सोमवारी पुन्हा दुपारी कराड रस्त्यावर सती परिसरात वणवा लागला. याबाबतची माहिती पर्यावरणप्रेमी व जलदूत शाहनवाज शाह यांना दिल्यानंतर त्यांनी नगरपरिषदेला कळवत अग्निशमन बंब पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार नगरपरिषदा बंब घटनास्थळी पाठवून दिला. त्यानंतर अग्निशमन दलाया कर्मा-यांनी रस्त्यालगतचा वणवा विझवला.
दरम्यान, सती येथून नंतर अलोरे वरीवाडी येथे भीषण वणवा लागल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरपरिषदेचा बंब पुन्हा अलोरेत धावला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वणवा लागल्याचे कळल्यानंतर क्रांती युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वणवा विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या दरम्यान प्रितम आंब्रे हा तरुण आपली दुचाकी लावून वणवा विझवण्यासाठी गेला असता या वणवण्यात त्याची दुचाकी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याबरोबर कातकरी टेप येथील सुभाष पवार, धोंडीराम पवार यांच्या दोन लाकडाच्या खोपट्या जळून खाक झाल्या. त्याबरोबर या परिसरातील आंब्याच्या कलमांना आगी झळ पोचली.