राजापूर:- सॅटीनरी चेस क्लब गोवा यांच्या सहयोगाने राजापूर रॉयल चेस अॅकॅडमीच्यावतीने महाशिवरात्री चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये खुली बुद्धिबळ रॅपिड स्पर्धा येत्या उद्या बुधवारी (ता. २६) होणार आहे. शहरातील गुजराळी येथील श्रीमंगल कायार्लयामध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे. या स्पधेर्तील विविध वयोगटातील विजेत्यांना रोख रक्कमेसह उत्कृष्ट राजापूर खेळाडू, उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू, उत्कृष्ट महिला खेळाडू, उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू, सर्वात लहान खेळाडू अशी आकर्षक बक्षिसे देऊन खेळाडूंना गौरवण्यात येणार आहे. त्यामध्ये सुमारे ३५ हजार रुपयांची रोख बक्षिसे, ४९ आकर्षक चषक आणि ७९ पदके यांचा समावेश आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहितीसह नावनोंदणीसाठी अमृत तांबडे, मोहसीन सय्यद यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.