मंडणगड:-तालुक्यातील बाणकोट येथे रहात असलेल्या सोमनाथ सोमनाथ मोतीराम कुंचाळे (50, मूळचे पिंपरी पाडा, मुंबई ईस्ट) यांनी दारूच्या नशेत असताना भाडयाया घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना 22 फेबुवारी रात्री दहा ते 23 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.