दापोली:- दापोलीमधील प्रकाश सिताराम साळुंखे या 70 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.
याबाबतची खबर गणेश पवार (जालगाव, गव्हाणपाडा, मुलुंड) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली. यानुसार पवार यांचे सासरे प्रकाश साळुंखे यांची तब्ब्येत बिघडल्याने खासगी डॉक्टरांना तपासणीसाठी घरी बोलावण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल, असा सल्ला दिला. त्याप्रमाणे दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांना तत्काळ दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून त्यांना मृत घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र नलावडे करीत आहेत.