खेड:-भरणे येथे अल्टो कारने पादचाऱ्याला धडक पादचारी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कार चालक राज सुनील भोसले याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केल्याचा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला.
बबन लक्ष्मण मुकणे (35 रा. पुरे बुद्रुक आदिवासीवाडी), राजेंद्र विष्णू भोसले (62 एसटी डेपोसमोर, खेड) बबन मुकणे हे भरणे येथे बसची वाट पहात होते. यावेळी अल्टो कारने राज भोसले याने त्यांना धडक दिली. तसेच दुचाकीलाही ध़डक देत पलायन केले. येथील नागरिकांनी त्याला शिताफीने पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांच्या दुखापतीसह दुचाकीचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.