रत्नागिरी:- तालुक्यातील भोके येथील आंबेडकरवाडी येथील शेत जमीनीमध्ये बेकायदेशिरपणे आक्रमकपणे घूसून तेथील 25 हजारांचे लोखंडी गेट चोरुन नेले. ही घटना शनिवार 8 फेब्रुवारी ते रविवार 16 फेब्रुवारी या कालावधीत घडली आहे.
याबाबत अनिल वेतोसकर, अभिषेक वेतोसकर (दोन्ही रा.आंबेडकरवाडी भोके,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात दिनेश वनराज ओसवाल (58,रा. मारुती आळी,रत्नागिरी) यांनी शनिवार 22 फेब्रुवारी रोजी ग्रामीण पेालिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी दिनेश ओसवाल यांची मौजे आंबेडकरवाडी भोके येथील गट नं.11 (4) मधील शेतजमिनीमध्ये बेकायदेशिर अतिक्रमण करत दोन्ही संशयितांनी तेथील गडगा पाडून शेतामध्ये प्रवेश करण्यासाठी तेथील लोखंडी गेट चोरुन नेले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.