पाणी टंचाईची समस्या भेडसावणार
रत्नागिरी:- भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलल्या पाहणीमध्ये लांजा तालुक्यातील पाणी पातळी २.५० मीटर इतकी आहे. तसेच पाच तालुक्यांमधील भूजलपातळी कमी असल्यामुळे तिथे पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील ६३ विहीरी सर्वेक्षणासाठी निश्चित केल्या आहेत. त्यांची पाणीपातळी मोजून टंचाईची तीव्रतेचा अंदाज बांधला जातो. जिल्ह्यात यंदाही सरासरीच्या १०४ टक्के पाऊस पडला होता. सर्वात जास्त पावसाचे प्रमाण असलेल्या जिल्ह्याच्या भूजलपाळीने यंदा दिलासा दिला आहे. हे सर्वेक्षण दर तीन महिन्यांनी केले जाते.
जानेवारीत जिल्ह्याची भूजलपातळी मोजण्यात आली होती. त्यामध्ये लांजा तालुक्यातील ३ ठिकाणच्या विहिरीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यमध्या पाणीपातळी ८.२७ मीटर इतकी सर्वात खोल होती. भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणची जानेवारी २०२५ मध्ये भुजलपातळी मोजण्यात आली. त्यामध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्याची भूजल पातळी ०.०९ मीटरने वाढलेली आहे. मंडणगड तालुक्यातील भूजल पातळी २.७२ मीटर इतकी होती. असेही सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहेत.
मंडणगड तालुक्याची पाणीपातळी सर्वांत चांगली आहे. शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या विहिरी तसेच बोअरवेलची खोदाई करण्यात येते. त्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.