रत्नागिरीः ब्रेन स्ट्रोकने आजारी असलेल्या वृद्धाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. रमेश तुकाराम भाटकर (वय ६६, रा. एमआयडी, मिरजोळे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २२) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाटकर २०२४ पासून आजारी होते. शनिवारी त्यांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले.