संगमेश्वर:- देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांसाठी जिल्हा क्रीडा खात्याच्या सहकार्याने मॅटेड बास्केटबॉल कोर्टची उभारणी केली आहे.
या बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन गुरुवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे. या बास्केटबॉल कोर्टला एकूण रुपये १७ लाख इतका खर्च आला असून, यामध्ये शासनाच्या क्रीडा खात्याकडून सात लाखांचे अनुदान मिळाले. उर्वरित निधी संस्थेने उभारला. या क्रीडा सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व समाजाचे प्रकृती स्वास्थ्य व आरोग्य उत्तम राहण्याकरिता निश्चितच मदत होईल, असे सदानंद भागवत यांनी सांगितले.