दिग्दर्शक आणि पोशाख डिझायनर शीतल शर्मा यांनी रत्नागिरीत येऊन घेतली साडीची माहिती
रत्नागिरी:- छावा चित्रपटाने तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी म्हणजेच महाराणी येसूबाई यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाणा हिने साकारली आहे. महाराणी येसूबाई या मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर इथल्या. त्यांचे माहेर शृंगारपूर होते.
चित्रपटामध्ये येसूबाईंची भूमिका करणाऱ्या रश्मीका मंदाणा हिला महाराणी येसूबाई यांच्या सारखाच पोशाख करावा लागला. महाराणी येसूबाई यांच्या साड्या कश्या होता? कशा पद्धतीने विणल्या गेल्या होत्या? कोणते कापड वापरले गेले होते? याची माहिती दिग्दर्शक आणि पोशाख डिझायनर शीतल शर्मा यांनी रत्नागिरीत येऊन घेतली.रत्नागिरीतील काही ठिकाणी भेटी दिल्या. काही टेलरना भेटून माहिती घेतली.रत्नागिरीसह त्यांनी विविध शहरांना भेटी दिल्या. आणि वेगवेगळी माहिती गोळा करून मग साडी तयार करण्यात आली.
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा विकीसोबतच औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
सुरुवातीला लोकांनी त्या अभिनेत्याला ओळखलंच नव्हतं. पण नंतर जेव्हा लक्षात आलं की ही भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्ना आहे तेव्हा मात्र लोकांना नक्कीच आश्चर्य वाटलं होतं.
छावामधील येसूबाईंच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत
मात्र चित्रपटात सर्वच गोष्टी आणि भूमिकांवर अगदी बारकाईने लक्ष दिलं गेलं आहे. तसेच सर्वच कलाकारांच्या भूमिकांसाठी खूप मेहनत घेतली गेली आहे. त्यात रश्मिका मंदान्नाच्या लूकसाठीही बरीच मेहनत घेतली गेली. रश्मिकाने संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईची भूमिका साकारली.तिच्या लूकवरही बरेच काम करण्यात आलं.
कोण होत्या येसूबाई?
महाराणी येसूबाई ह्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. त्या मराठा साम्राज्याच्या द्वितीय अभिषिक्त महाराणी होत्या. या मराठा साम्राज्याचे(स्वराज्याचे) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर हे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते. महाराणी येसूबाई साहेब या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती सम्राट शाहू महाराज यांच्या मातोश्री होत्या. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कुलमुखत्यार पदाची शिक्के कट्यार प्रधान केले होते. त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या.
अनेक शहरांना भेटी देऊन साड्यांची माहिती घेतली
‘छावा’च्या निर्मात्यांना केवळ औरंगजेबच नाही तर सर्व पात्रांना पडद्यावर अचूकपणे आणण्यासाठी जवळजवळ 1 वर्ष लागलं. चित्रपटातील पात्रांच्या पोशाखांची संपूर्ण जबाबदारी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि पोशाख डिझायनर शीतल शर्मा यांनी घेतली होती. यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, पैठण आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांना भेटी दिल्या.
म्यूजियममधील साड्यांचे फोटो घेऊन तशाच साड्या बनवल्या
रश्मिकाने चित्रपटात कोणतीही सामान्य साडी नेसली नव्हती तर पैठण आणि नारायणपेठ येथील साड्या परिधान केल्या होत्या. पूर्वी या साड्या नेमक्या कशा होत्या यासाठी लक्ष्मण उतेकर आणि शीतल यांनी अनेक संग्रहालयांना भेटी दिल्या. अनेक फेऱ्या मारल्या.
चित्रपटात रश्मिकाच्या अंगावर 500 वर्ष जुनी साडी
म्यूजियममधील त्या काळच्या साड्या बनवण्यासाठी साड्यांचे आधी फोटो काढून मग त्या तशाच बनवल्या गेल्या. एवढंच नाही तर चित्रपटामध्ये रश्मिकाने नेसलेल्या एका साडीवर 500 वर्ष जुन्या साडीची बॉर्डर देखील लावण्यात आली आहे. चित्रपटात रश्मिका खूप सुंदर रंगाच्या नऊवारी नेसल्या आहेत.
साड्यांच्या रंगसंगतीबद्दलही केला अभ्यास
रश्मिकासाठी ज्या साड्या बनवण्यात आल्या होत्या त्यांच्या रंगसंगतीबद्दल सांगायचं तर एका रिपोर्टनुसार ऐतिहासिक चित्रपटांमध्ये दाखवलेली पात्रे शक्यतो पांढऱ्या किंवा पेस्टल रंगाच्या कपड्यांमध्येच दाखवले जातात. तथापि, जेव्हा चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्याबद्दल वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जुन्या काळात लोक विविध रंगांचे कपडे घालत असत.
लक्ष्मण उतेकर यांनी त्यांच्या संशोधनासाठी अनेक जुने किल्ले, संग्रहालये आणि इतिहासकारांना भेटी दिल्या. रश्मिकाच्या दागिन्यांची रचना देखील संग्रहालयातील दागिनेपाहून तशापद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.