खेड :शहरातील शिवाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. फहिम फारूक देशमुख (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला नोकरीधंदा नव्हता. यामुळे त्याला नैराश्य आले होते. या नैराश्यातून राहत्या घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.