रत्नागिरी:-शहरालगतच्या शिरगांव बाणेवाडी येथे दोन अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरण्याचा प्रकार रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने ही बाब दुचाकी मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने स्थानिकांच्या मदतीने या मुलांना पकडले आणि रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही दोन्ही मुले 13 ते 14 वयोगटातील आहेत. पोलिसांच्या पथकाने दोन्ही मुलांना ताब्यात घेतल़े आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.