दापोली : घरमालक घरात नसल्याचा फायदा उचलून घरातील ३४ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी आगरवायंगणी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाभोळ पोलिस ठाण्यामधून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद देवस्थळी यांचे पोस्टाचा कातळ आगरवायंगणी येथे घर आहे. १ ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत संशयित अक्षय रामाणे याने बंद घरातील १० हजार रुपयांची बॅटरी, ५ हजार रुपयांचा इन्व्हटर, १ इलेक्ट्रिक किटली, १ हिटर स्टोव्ह, स्टेनलेस स्टीलचा सत्तूर, पितळी कुलूप, खिडक्यांना पडदे लावण्याकरीता ब्रकेटचे बॉक्स, इलेक्ट्रिक केबलचे पाच बंडल, एअर पेस्टल व अन्य सामान चोरले असून याबाबत दाभोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.