सीसीटिव्हीत कैद
रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्यावरील माहिती फलक काही समाज कंटकांनी तोडल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरापासून अवघ्या २ किमी अंतरावर रत्नदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढला असून पायथ्याशी भगवती बंदर आहे. १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेला आणि जुन्या दरबाराच्या जवळ दोन संरक्षक बुरुज बांधले होते. त्यामुळे या किल्ल्याची माहिती येणाऱ्या पर्यटकांना मिळावी,
यासाठी बुरूज आणि इतर माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. काही समाजकंटकांनी नव्याने लावण्यात आलेले फलक तोडून टाकल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
संपूर्ण भगवती किल्ल्यावर सीसी टिव्हीची नजर आहे. या सीसी टीव्हीमध्ये या समाज कंठकांचे हे कृत्य कैद झाले आहे. याची भगवती किल्ला ट्रस्टने गंभीर दखल घेतली असून त्याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली आहे. या घटनेमुळे काहीसा तणाव निर्माण झाला असून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांच्या शोधात पोलिस यंत्रणा आहे. रात्री उशिरा या बाबत शहर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला.