रत्नागिरी पोलीस मुख्यालयात होते कार्यरत, 2023 ला पोलीस दलात जाईन
रत्नागिरी : कोल्हापूर भुईबावडा गगनबावडा मार्गावर तिरवडे येथील अवघड वळणार बोलेरो पिकअपची अॅक्टिव्हा गाडीला धडक बसुन रत्नागिरीतील पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असणारी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला अधिक उपचारासाठी ओरस येथे हलविण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. कृष्णा मनोहर ठोंबरे ( 25, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मोटार सायकल स्वार कृष्णा मनोहर ठोंबरे हे आपल्या अॅक्टिव्ह गाडीने रत्नागिरीहून कोल्हापूर येथे जात असताना तिरवडे येथील अवघड वळणार कोल्हापूर येथून उंबर्डे येथे भाजी घेऊन जाणाऱ्या बोलेरो टेम्पोला दुचाकी धडकली. त्यात ठोंबरे यांच्या डोक्याला मार लागुन रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत आलेल्या मुलीला जोरदार मार लागला असून गंभीर जखमी झाली आहे.
कृष्णा ठोंबरे हे 2023 ला पोलीस दलात जॉईन झाले. ते रत्नागिरी पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. आज पहाटे ते रत्नागिरीतून कोल्हापूरला निघाले होते. यावेळी त्यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.