राजापूर : जमिनीच्या वादातून आईच्या डोक्यात दगडी फरशीचा तुकडा मारल्याची घटना सोलगाव येथे बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी सचिन वासुदेव गुरव (४६, रा. सोलगाव, राजापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सचिन याने गावातील घर व सर्व जमीन माझ्या नावावर कर, असे आईला सांगितले होते. त्यावर आईने यावर आपण मार्ग काढू असे सांगितल्याने त्याला राग आला. त्यातून मारहाण केली. या मारहाणीत आई जखमी झाली आहे.