लोटे एमआयडीसी अग्निशमनचे 3 तास बचाव कार्य
खेड / प्रतिनिधी:- तालुक्यातील आवाशी येथील एका विहिरीत पडलेल्या 46 वर्षीय प्रौढासह कुत्र्याला 3 तासांया बचावकार्यानंतर लोटे एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. हरिंदर सिंग (सध्या रा. आवाशी) असे प्रौढाचे नाव असून उपारासाठी रूग्णवाहिकेतून परशुराम रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री 10.40च्या सुमारास घडली.
आवाशी येथील एका 80 फूट खोल विहिरीत व्यक्तीसह कुत्रा पडला असल्याची माहिती लोटे एमआयडीसीतील अग्निशमन दलास कळवण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलातील उपअग्निशमन अधिकारी ए. जी. सरवदे, प्रमुख अग्निशमन विमाक व्ही. एन. देसाई, एस. एस. कुलये, एम. एम. मोरे, फायरमन एम. डी. पांगणे, व्ही. व्ही. कारंडे, पी. आर. कांबळे आदों पथक तातडीने घटनास्थळी पोहून बावकार्य हाती घेतले. विहिरीत पडलेल्या प्रौढासह कुत्र्याला दलातील जवानांनी दोरीच्या सहाय्याने खाली उतरून 3 तासांच्या शर्थीचे प्रयत्नानंतर सुखरुप बाहेर काढले. रात्री 10.40 वाजता सुरू झालेले बावकार्य मध्यरात्री 2.30 च्या सुमारास थांबले. लोटे एमआयडीसीतील अग्निशमन दलातील जवानांच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.