राजापूर :- राजापूर शहरातील सिनेमा टॉकिजच्या नजीकच्या तीन पान शॉप्स मध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कुलुपे तोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोराने दुकानांमध्ये काही रोख रक्कम, चिल्लर चोरल्याचे समजते आहे. यासंदर्भात दुकान मालकांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राजापूर शहरातील सिनेमा टॉकीज नजीकच्या नित्यानंद बावधनकर, पुरुषोत्तम रहाटे आणि कृष्णा रघुनाथ पवार यांची पान शॉप्स आहेत. अंदाजाप्रमाणे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानांची टाळे तोडून त्यामधील रोकड चोरल्याची माहिती पोलिस ठाण्यात दिली आहे.