खेड / प्रतिनिधी:- तालुक्यातील भरणे जगबुडी पुलासह साई रिसॉर्टनजीक दोन दुचाकींना धडक देवून अपघात करत पसार झालेल्या एका अल्टो कारालकास भरणे पोलीस चौकीत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी कारसह शिताफीने पकडले. ही घटना शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. या काराचालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची बाबही समोर आली आहे. दोन दुचाकींना दिलेल्या धडकेनंतर दोन्ही दुचाकीवरील प्रवासी खाली कोसळून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या. दुचाकींना धडक देत पसार झालेल्या कार चालकास जागरूक ग्रामस्थांसह पोलिसांनी पाठलाग करत पकडले. सायंकाळी उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यी प्रक्रिया सुरू होती.