संगमेश्वर/ मकरंद सुर्वे:-संगमेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे.आईने अभ्यास कर असे सांगितल्याने त्याचा राग मनात घेऊन आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या कसबा येथील शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मृण्मयी गजेंद्र देशमुख असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती जवळच्या शाळेमध्ये आठवी इयत्तामध्ये शिकत होती.
मृण्मयी गजेंद्र देशमुख हिला शाळेत जाण्यास वेळ झाला. आईने शाळेत जाण्यास वेळेवर उठवले नाही म्हणून तिचे आणि आईचे सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली. आईने वेळेवर उठवले नाही याचा मनामध्ये राग घेऊन आई घरामध्ये काम करत असतानाच घराचा दरवाजा बंद करून घेतला आणि पडवीतील वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ मुलगी बाहेर न आल्याने आईने सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान हाक मारली मात्र हाकेला प्रतिसाद न मिळाले आईने दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला असता मुलगीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. सदरची बाब पोलिसांना समजल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या घटनेचे खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिवकुमार पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली.
गेल्या दोन वर्षापासून तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे काही दिवसापूर्वीच संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर संगमेश्वर जवळच्या कसबा येथील आठवी इयत्ता मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आले असून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत.