एकटीच असल्याची संधी साधून पाठीमागून धरून…..
वकिली शिकत असलेल्या मुलीवर विनयभंग करून बळजबरी करण्याचा प्रयत्न
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आज धक्कादायक प्रकार समोर आला. फलाट क्रमांक 3 वर लागलेली दिवा पॅसेंजर मधून एक तरुणी प्रवास करत होती. तरुणी रेल्वेच्या डब्यात एकटीच असल्याची संधी साधून एका तरूणाने मागून घट्ट मिठी मारून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तरुणीने जोरदार प्रतिकार करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणाने चालत्या गाडीतून उडी मारून पळ काढला आणि दगडफेक केली. या प्रकाराने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला चिपळूण येथून ताब्यात घेतले आहे. निफ्रान इमतिखान अली (30, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, लॉ कॉलेज खेड येथे संबंधित तरुणी दिवा पॅसेंजर गाडीने सकाळी चालली होती. यावेळी ती गाडीत एकटीच होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आली याने ट्रेनमध्ये घुसून तिला पाठीमागून मिठी मारून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. जवळपास 2 ते 3 मिनिटे त्याने तिला मिठीत जखडून ठेवले. घाबरलेल्या तरुणीने जोरदार आरडा ओरडा करताच तरुण पळून गेला. जाताना त्याने दगड ही फेकले.
घाबरलेल्या तरुणीने लगेच रेल्वे पोलिसांची संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली. रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्या तरुणाला चिपळूण रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. आणि रत्नागिरी शहर पोलिसांच्या हवाली केले.