दापोली/प्रतिनिधी:रिफायनरी आपल्या भागात आणायची की नाही, हा सर्वस्वी येथील जनतेचा निर्णय आहे. त्यामुळे येथील जनतेने आता आपल्याला रिफायनरी हवी आहे की नाही, हे ठरवावे. स्थानिक जनतेला हवी असेल तरा रिफायनरी होईल, अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी येथील जनता आंब्याच्या व नारळाच्या झाडांमध्ये समाधानी असेल तर ते चांगलेच आहे. मात्र येथील जनतेने आता आपल्याला रिफायनरी हवी आहे की नाही ते एकदा ठरवावे, असे स्पष्ट केले. अर्थसंकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्वी पावले उाालली आहेत. सामाजिक क्षेत्र, लहान मुले व युवा शिक्षण, पोषण तसा आरोग्यापासून स्टार्टअप्स व गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प गरीब व मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष केदार साठे, जि. प. माजी सदस्या स्मिता जावकर, तालुकाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष संदीप केळकर, धिरज पटेल आदी उपस्थित होते.