खेड / प्रतिनिधी:- मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाड हद्दीतील दासगावनजीक शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रसायन वाहतुक करणारा टँकर उलटला. टँकरमधून झालेल्या वायू गळतीने प्रशासनासह ग्रामस्थांमध्ये भीतो वातावरण पसरले. टँकराया केबिनमध्ये अडकलेल्या चालकास अथक प्रयत्नाने बाहेर काढून उपारासाठी महाड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.
टँकर चालक महाड एमआयडीसीतून मुंबईाया दिशेने जात होता. दासगावनजीक आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. टँकरमधून रसायन रस्त्यावर पसरले. लगतच्या गटारातून लोकवस्तीपर्यंत पोचण्याच्या शक्यतेने ग्रामस्थ भयभीत झाले. अपघाताचे वृत्त कळताच महाड एमआयडीसी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोचल्या.
अपघातग्रस्त टँकरमधून होणारी गळती थोपवण्यासाठी अग्निशमक दलासह अन्य लोकांची मदत घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अपघातामुळे काहीकाळ वाहतूकही ठप्प झाली. अपघातग्रस्त टँकर बाजुला हटवल्यानंतर सुरूवातीला एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर विस्कळीत वाहतूक पूर्ववत झाली.