मंडणगड : मंडणगड नगर पंचायतीच्या सत्तातरांची राजकीय चर्चा व शक्य अशक्यतांना तिलांजली देत नगर पंचायत विषय समिती सभापती व सदस्य निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. 21 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या उपस्थितीत प्रक्रियेचे प्रशासकीय सोपस्कर पूर्ण करण्यात आले.
निवडीसंदर्भात मुख्याधिकारी यांच्याकडून प्राप्त माहीतीनुसार, नगर पंचायतीचे सार्वजनीक बांधकाम समितीचे सभापती पदावर नगरसेविका सौ. राजेश्री सापटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांची निवड झाली. समितीचे सदस्यपदी नगरसेवक मुकेश तलार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) नगरसेविका सौ. मनीषा हातमकर ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) नगरसेवक आदेश मर्चंडे (शहर विकास आघाडी) नगरसेवक नीलेश सापटे (शहर विकास आघाडी) यांची निवड झाली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापतीपदी नगसेवक सुभाष सापटे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांची निवड झाली. समितीचे सदस्यपदी नगरसेविका सौ. प्रियांका लेंडे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) नगरसेविका सौ. रेश्मा मर्चंडे, नगरसेवक योगेश जाधव (शहर विकास आघाडी) नगरसेवक मुश्ताक दाभिळकर (शहर विकास आघाडी) यांची निवड झाली.
स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनीक आरोग्य समितीचे सभापतीपदी नगरसेवक वैभव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांची निवड झाली. समितीच्या सदस्यपदी नगरसेविका मनिषा हातमकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), नगरसेवक मुकेश तलार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) नगरसेवक विनोद जाधव (शहर विकास आघाडी) नगरसेविका प्रमिला किंजळे (शहर विकास आघाडी) यांची निवड झाली.
महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदी नगरसेविका सौ. समृध्दी शिगवण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांची निवड झाली. समितीचे उपसभापती पदी नगसेविका सौ. सेजल गोवळे (शहर विकास आघाडी) यांची निवड झाली. सदस्यपदी नगरसेविका सौ. प्रियांका लेंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) नगरसेविका सौ. वैशाली रेगे (शहर विकास आघाडी) यांची निवड झाली.
या निवडीनंतर सर्व सभापती व सदस्यांचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप व मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी अभिनंदन केले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निवडी प्रक्रियेच्या काही दिवस आधी केलेली सत्तातरांचे घोषणा, यानंतर त्यांचे वाढदिवसाचे कार्यक्रमात नगरसेवकांचे निकटवर्तीयांनी केलेला जाहीर पक्षप्रवेश यांचे पार्श्वभूमीवर व पडद्यामागे झालेल्या भेटीगाठींचे पडसाद निवड प्रक्रियेवर होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना विद्यान सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांचा खुप मोठा प्रभाव सभापती निवडीवर झालेला दिसून आला आहे.
निवड झालेल्या चारही समित्यांचे सभापती पदे सत्ताधार्यांनी आपल्याकडे राखल्याचे निवडीनंतर दिसून आले आहे.