शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन
रत्नागिरी / प्रतिनिधी:-रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांनीही कामगिरीवर जाण्यास नकार दिला आहे. जिल्हा डी एड बी एड बेरोजगार संघटनेने निवेदन देऊन काम करण्यास नकार दिला आहे.
रत्नागिरी जिल्हा कंत्राटी शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की २३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार डी.एड, बी. एड धारकांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेला स्थानिक शिक्षक मिळाले होते. परंतु शासनाने १० फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयामुळे या स्थानिक शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षणविभाग हा जिल्हा बदली शिक्षकांमुळे कायम वादात सापडला आहे. कोणताही शासन निर्णय नसताना जिल्हा परिषदेने शिक्षक नसल्यामुळे स्थानिक डि. एड, बी.एड धारकांना तुटपूंच्या मानधनावर आपल्या स्तरावर नियुक्ती देखील दिली होती. त्यामुळे शिक्षण विभाग सावरला होता.. या वर्षी देखील अनेक शाळा शून्य शिक्षिकी आहेत.
गोर गरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल तर या जिल्ह्याला स्थानिक शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेने कंत्राटी तत्वावर घेतलेल्या शिक्षकांना पुढील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात काम करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाकडून मिळत नाहीत.. तो पर्यंत १० फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयाचा निषेध म्हणून कामगिरी शिक्षक म्हणून काम करण्यास संघटना नकार देत आहोत. या संदर्भात कंत्राटी शिक्षकांवर कोणतीही प्रशासनाकडून कारवाई झाल्यास जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आंदोलनचा पवित्रा घ्यावा लागेल. तरी आपणास पूर्व सूचना निविदाद्वारे देण्यात आली आहे.