रत्नागिरी : २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल, ठाणे या संस्थेच्या लहान मुलांची बाप गोष्ट या नाटकाला प्रथम पारितोषिक, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे या संस्थेच्या माय सुपर हिरो या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच आनंद तरंग फाऊंडेशन, वाघेरे, इगतपुरी या संस्थेच्या हॅपी बर्थ डे या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक वैभव उबाळे (नाटक-लहान मुलांची बाप गोष्ट), द्वितीय पारितोषिक सतिश वराडे (नाटक-हॅपी बर्थ डे), तृतीय पारितोषिक रविंद्र सातपूते (नाटक- माय सुपर हिरो), नाट्यलेखन प्रथम पारितोषिक संकेत पगारे (नाटक- हॅपी बर्थ डे), द्वितीय पारितोषिक संदीप गचांडे (नाटक- तिने घडविला श्याम), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक निखिल मारणे (नाटक- माय सुपर हिरो), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (नाटक- लहान मुलांची बाप गोष्ट), नेपथ्य : प्रथम पारितोषिक केशर चोपडेकर (नाटक- जगाओ मेरा देश), द्वितीय पारितोषिक केतन दुधवडकर (नाटक- लहान मुलांची बाप गोष्ट), संगीत दिग्दर्शक: प्रथम पारितोषिक अनमोल देशपांडे (नाटक- झिलमिल), द्वितीय पारितोषिक आशुतोष वाघमारे (नाटक- न्युटनचा लायन), वेशभूषा प्रथम पारितोषिक अवनी पटवर्धन (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक स्नेहल आरळी (नाटक- सुखी सदऱ्याचा शोध), रंगभूषाः प्रथम पारितोषिक पंकज साखरे (नाटक झेप), द्वितीय पारितोषिक अनुराधा कराळे (नाटक- जगाओ मेरा देश) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरुष हर्षदिप अहिरराव नाटक (हॅपी बर्थ डे) प्रत्युष महामुनी (नाटक- माय सुपर हिरो), साईराज सरडे (नाटक- तेरा मेरा सपना), तक्षशिल भोसले (नाटक- हेच का ते बालपण देवा ?), व्यंकटेश माकडे (नाटक- राखेतून उडाला मोर), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक स्त्री प्रांजल सोनावणे (नाटक- हॅपी बर्थ डे) मनस्वी केसरकर (नाटक- लहान मुलांची बाप गोष्ट), मन्वी लहूरीकर (नाटक- झिलमिल), चतुर्थी बेडेकर (नाटक- अभागी तारा), पूर्वा सबनिस (नाटक झाले मोकळे आभाळ) अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे स्पृहा मोराणकर (नाटक- ठोंब्या ठोबीची गोष्ट), निधी मांडलिया (नाटक-विसर्जन), शर्वरी पवार (नाटक- तिने घडविला श्याम), दिया गीते (नाटक-न्युटनचा लायन), आर्या जगताप (नाटक- बेला), राघव जोशी (नाटक स्कॉलरशिप), हिमांक कुळकर्णी (नाटक- मुग्यांची दुनिया), अद्वैत तराळ (नाटक-तेरा मेरा सपना टी. व्ही. हो अपना) प्रभंजन फडतरे (नाटक-सुखी सदऱ्याचा शोध) रोहन वाघिरे (नाटक- डोक्यात गेलयं)
दि. १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे अतिशय जल्लोषात झालेल्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण ३२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. संतोष आबाळे, श्री. गिरीष भुतकर, श्री. राजेश जाधव, श्री. संग्राम भालकर, श्रीमती राधिका देशपांडे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या बालनाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘लहान मुलांची बाप गोष्ट’ प्रथम
