▪️ आजवर तीन पुस्तकांचे प्रकाशन
▪️ अमेरिकेतील नागरिकत्व
संगमेश्वर / प्रतिनिधी :- मूळ पुणे येथील असलेल्या आणि बालपणी लेखनाची आवड होती मात्र ती उशिरा लक्षात आल्याने इंजिनीयर व्हावे लागलेल्या मोहन रानडे यांनी काही वर्ष पुणे येथे इंजिनियर म्हणून काम केले. नंतर अमेरिकेला १९८० च्या दशकात विविध क्षेत्रातील पदवीधर माणसं आवश्यक असल्याने त्यांनी थेट अमेरिका गाठली. जिद्द चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अमेरिकेत स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले. नोकरी करत असतानाच विविध प्रकारचे पाच व्यवसाय करत, रानडे यांनी आपले लेखन क्षेत्रातील अपूर्ण स्वप्न साकार करण्याचा जणू ध्यासच घेतला.
अमेरिकेतील मासिकात लेखन करता करता ते त्या मासिकाचे संपादक झाले. वाचकांच्या मागणीनुसार त्यांनी विविध लेखांची दोन सुंदर पुस्तके प्रकाशित केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची माहिती मिळताच आपले तिसरे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मोहन रानडे यांनी अमेरिकेहून थेट दिल्ली गाठली. आज दिल्ली येथील साहित्य संमेलनात थेट अमेरिकेहून केवळ पुस्तक प्रकाशनासाठी दिल्लीत आलेल्या मोहन रानडे यांच्या ” मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टी ” हे पुस्तक मोठ्या दिमाखात प्रकाशित करण्यात आले.
मोहन रानडे ५० वर्षे अमेरिकेत न्यू जर्सी येथे , इंजिनियर म्हणून काम करत होते. त्यावेळी अमेरिकेला तज्ञ मंडळींची गरज असल्याने,ग्रीन कार्ड मिळत होते. ७४ साली पुणे येथून अमेरिकेत जाण्यापूर्वी किर्लोस्कर ऑइल इंजिनला दोन वर्षे आणि टेलको ई.आर.सि.मध्ये तीन वर्षे रानडे यांनी काम पाहिले. त्यावेळी अमेरिकेन सरकारला काही क्षेत्रातील माणसं कमी पडतील म्हणून ईमिग्रेशन कायदा पास केला आणि त्यांनी ज्यांच्याकडे डिग्री असेल त्याला ग्रीन कार्ड द्यायला सुरुवात केली.
स्टील मिल मध्ये अमेरिकेत टू.डी.डिझाईनर इंजिनियर म्हणून, त्यानंतर अन्य दोन कंपन्या असे पाच वर्षे वेगवेगळे जॉब केले. मोहन रानडे यांना ८० साली अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. तेथील नागरिक म्हणून अमेरिकन नेव्ही मध्ये ते सेवेत रुजू झाले . काही कालावधी नंतर पत्नी आणि मुलाला सोबत अमेरिकेला नेले. ८० साली मुलीचा जन्म अमेरिकेतच झाला. सलग ३१ वर्षें म्हणजे १९८० ते २०११ पर्यंत रानडे यांनी अमेरिकेत सेवा केली. फिलाडेल फिया येथे नेव्हीचं शिप रिपेअर डॉक आहे, तेथे प्रोडक्शन सुपरीटेंड म्हणून काम केले , तेथेच नेव्हीचे इंजिनियरिंग सेंटर आहे तेथे गियर डिझाईनचे तंत्रज्ञान म्हणून इंजिनियर म्हणून सलग ३१ वर्षे सेवा केली .
आज मोहन रानडे यांचे वय ८० असताना देखील त्यांची उत्साह आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे . यासाठी त्यांना पुणे येथील संस्कार उपयोगी पडले. निवृत्ती नंतर विविध प्रकारचे पाच व्यवसाय रानडे यांनी अमेरिकेत सुरु केले. शास्त्रीय संगीताची घराण्यातच आवड असल्यामुळे यात काहीतरी वेगळं काम करूया असं त्यांनी ठरवलं. वाद्य संगीताच्या ध्वनी मुद्रीका तयार करणे यासाठी, १९७८ साली ध्वनी मुद्रिका वितरक, तेंव्हा पासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. लाईव्ह कॉनसर्ट, मराठी फळ बाजारपेठ, चपराक दिवाळी अंक आणि अन्य मराठी पुस्तकं विकतो रानडे अमेरिकेत आपल्या स्टॉलवर विकत असतात.कारागिरांच्या, चित्रकारांच्या हातांना त्यांनी उत्तम काम दिले आहे . भारतातील उत्तम छायाचित्रांना ते अमेरिकेत वॉलपेपरच्या सहाय्याने छायाचित्रकारांना काम मिळवून देतात. रानडे ट्रॅव्हल एजन्ट म्हणून देखील काम करतात. रानडे यांचा मुलगा अमित सी.ए. आहे, कन्या निलजा यांनी मार्केटिंग एम.बी.ए. केले असून त्या मार्केटिंगच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत.
लेखनाचा गुण बालपणापासून होता मात्र तो उशिरा लक्षात आला आणि मी इंजिनियर झालो. अमि्रिकेत बृहन महाराष्ट्र वृत्त हे हस्त लिखित मासिक ८१ साली सुरु झालं, ते आजही सुरु आहे. त्या संपादकांवर मोहन रानडे टीका करत असंत . सहा वर्षांनी त्यांनी रानडे यांना संपादक होण्याची ऑफर दिली. रानडे यांनी मासिक हस्तलिखित होतं ते संगणकीय केलं. अल्प कालावधित ते वाचकप्रिय केलं. मासिकाचा २०० वरून खप १५०० वर गेला, कायम वर्गणीदार केले. यात लेख आणि वृत्त छापायचं काम सुरु केलं होतं. मासिकात शेवटचं पान या नावाने त्यांनी सदर लेखन सुरु केलं. लोकांच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आणि वेगवेगळ्या विषयांवर लिहू लागलो.
रानडे यांना विनोदी लेखन लिहायला आवडते. पुस्तक काढण्यासाठी वाचक त्यांच्या मागे लागले. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी दोन दिवसांत त्यांना पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून दिली. पुस्तकाचं नांव ” शेवटचं पान “. विशेष म्हणजे या पुस्तकाचे मुखपृष्ठ एका अमेरिकन महिला चित्रकाराने केले आहे. या पुस्तकाच्या दोन आवृत्ती झाल्या. पुस्तकाचं टायपिंग ते स्वतः करतात . २०१७ साली नोकरी करून व्यवसाय करणाऱ्यांसाठी ” माझी उद्योगी मुशाफिरी ” हे दुसरे पुस्तक प्रकाशित केले. दुसऱ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ अमेरिकेत वास्तव्याला असणारे चित्रकार मिलिंद रानडे यांनी केले आहे.
दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याची माहिती अमेरिका स्थित लेखक मोहन रानडे यांना मिळाली. त्यांचे लेख लिहिण्याचे काम सुरूच होते. आपल्या देशात आणि मराठी साहित्याचा जागर करणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात आपले पुस्तक प्रकाशित व्हावे या दृष्टीने त्यांनी वेगाने काम सुरू केले. २० जानेवारी रोजी रानडे पुणे येथे आले. त्यानंतर त्यांनी ” मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टी ” हे पुस्तक साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यासाठी छापून घेतले. अमेरिका येथील न्यू जर्सी येथे मोहन रानडे यांच्या निवासस्थानी जेवढे म्हणून मोठमोठे कलाकार आले त्यांच्यावरील लेखांचे एक सुंदर पुस्तक मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टीत आहेत. पहिल्या दोन पुस्तकांच्या तुलनेत मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टी हे पुस्तक फारच अल्प कालावधीमध्ये मोहन रानडे यांनी तयार केले आहे.
▪️आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला संदेश द्यायचा आहे की, निव्वळ मी नाही असे इतके उत्तमोत्तम अमेरिकास्थित मराठी लेखक आहेत, त्यांची पुस्तक प्रकाशित होतात त्यांना आवर्जून अशा संमेलनातन एखादा बूथ मिळावा. त्यांची पुस्तक इथे लोकांना बघायला मिळावी, अशी माझी अपेक्षा आहे.
—– लेखक मोहन रानडे, न्यू जर्सी अमेरिका
अमेरिकेत ५० वर्षे वास्तव्य केलेले मोहन रानडे खास पुस्तक प्रकाशनासाठी दिल्लीत !
