उद्या होणार ‘उदकशांत’ या नाटकाचा प्रयोग
संगमेश्वर:- तालुक्यातील परचुरी चंदरकरवाडी येथे श्री भैरी भवानी मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दि. २१, २२ फेब्रुवारी रोजी दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भैरी भवानी मंडळाचे सन २०२५ हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमिताने आज शुक्रवार दि. २१ पेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता श्री भैरी भवानी कुलदेवतेचा अभिषेक व आरत्या, दुपारी ३ वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता भजन, रात्री ९ वाजता श्री भैरी भवानी मंहाळाचे बहुरंगी नमन आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरत्या, दुपारी ३ वाजता हळदी कुंकु समारंभ, सायंकाळी ६ ते ८ महाप्रसाद, रात्री ८ वाजता मान्यवरांचा सत्कार, रात्री १०.३० वाजता श्री. समीर मोने लिखित दोन अंकी कौटुंबिक नाटक ‘उदकशांत’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘उदकशांत’ नाटकाचे निर्माता जयराम घाणेकर, अनिल चंदरकर, गणपत चंदरकर असून दिग्दर्शक म्हणून सुनिल चंदरकर आहेत.
सत्कार सोहळ्याला पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासह पर्शुराम वेल्ये, सरपंच शर्वरी वेल्ये, प्रदिप चंदरकर, महेश लिंगायत, महेश देसाई, वसंत मेसी, राजेश मुकादम, अनंत शिंदे, हरिबंद्र बंडबे, डॉ. विनायक पेठे, दिपक कळंबटे, बापू लिंगायत, सुधीर लिंगायत, संतोष मेस्त्री, दीपक लिंगायत, दिप्ती खातू, रविना चौघुले, रमजान गोलंदाज, पत्रकार मुझम्मील काझी उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वाडीप्रमुख शांताराम चंदरकर, मुंबई अध्यक्ष सचिन चंदरकर, प्रकाश घाणेकर, सुरेश चंदरकर, तेजस दुदम, शाहीर संदेश दुदम, संजय चंदरकर, संतोष चंदरकर, किशोर घाणेकर, अनिल चंदरकर, उमेश दुदम यांनी केले आहे.