महाशिवरात्र व आ. शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस मुंढेतर्फे आयोजन
चिपळूण (प्रतिनिधी):– महाशिवरात्र व चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती चिपळूण माजी सभापती सूर्यकांत खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंढे तर्फे चिपळूण यांच्यातर्फे शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी अलोरे मैदान येथे महाराष्ट्र कोकण केसरी २०२५ भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ८ वाजता होईल, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, मुंढे तर्फे, चिपळूण सरपंच महेश उर्फ मयूर खेतले यांनी दिली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, आ. शेखर निकम, आमदार कराड दक्षिण अतुल भोसले, आमदार किरण सामंत, माजी आ. डॉ. विनय नातू माजी आ. सदानंद चव्हाण भाजपा पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य आबासाहेब पाटील, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ पुजा निकम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जि. प. बांधकाम समिती सभापती अरुण कदम, अखिल भारतीय मराठा महासंघ कोकण विभाग अध्यक्ष अप्पा खैर, आरपीआय महाराष्ट्र राज्य संघटक संदेश मोहिते, सिंधुदुर्ग माजी उपाध्यक्ष काका कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रामवरदायिनीनी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रताप शिंदे, मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक राजेंद्र सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. साधना बोत्रे, माजी जि. प. विरोधी पक्षनेते अशोकराव कदम, ज्येष्ठ नेते दादा साळवी, डॉ. राकेश चाळके आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस सौ. दिशा दाभोळकर, भाजपा माजी चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर तसेच बैलगाडा संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्यास १ लाख रुपये, उपविजेत्यास ७० हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास ३५ हजार रुपये, पंचम क्रमांकास २० हजार रुपये व सहाव्या क्रमांकास १५ हजार व प्रत्येकी विजयी बैलगाडास मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी चिपळूणवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.