रत्नागिरी ः माझी राजकारणात 43 वर्षे गेली. राजकारणातील एवढ्या दीर्घ प्रवासात एकही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांनी सुद्धा केला नाही. माझ्या चारित्र्यावर कोणीही शिंतोडासुद्धा उडवलेला नाही, असे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
नाणीज येथे गजानन महाराज प्रकटदिन सोहळा सुरू आहे. राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्या नेत्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
यावेळी भास्कर जाधव यांनी मनोगत मांडले. याप्रसंगी व्यासपीठावर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, आ. किरण सामंत उपस्थित होते.