छावा मराठा संघटनेच्यावतीने आजपासून उपोषण सुरू
चिपळूण : चिपळूण तहसील कार्यक्षेत्रात अनधिकृत चाललेल्या रेती, दगड, चिरे, माती उत्खनन विरोधात आवाज उठवूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या चिपळूण तहसीलदाराविरोधात छावा मराठा योद्धा संघटनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख नयनेश भालचंद्र दळी, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळी यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. याबाबत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहेत.
नयनेश दळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, चिपळूण तहसील कार्यक्षेत्रात बेसुमार अनधिकृत उत्खनन. रेती, माती, दगड, चिरे चालू असल्यामुळे शासनाचा महसूल अधिकाऱ्यांमुळेच बुडत आहे. हे अधिकारी नयनेश यांचे पत्र मिळताच वाळू माफिया, माती माफिया, यांना ताबडतोब पत्राची माहिती देतात. त्यामुळे अनेक वेळा धमकवण्याचे प्रकार झाले आहेत. संबंधित वाळू माफिया, माफी यांच्याकडून किंवा अन्य कोणाकडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील याची वरिष्ठांनी दखल घ्यावी असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे दळी यांनी दिलेली तक्रार त्या ठिकाणी झालेले उत्खनन बरोबर असताना माझा बळी द्यायच्या हिशोबाने मलाच पार्टी करून जाब जबाब नोंदवण्यासाठी बोलत असतात. दिलेली तक्रार योग्य नसल्यास त्यांनी तसा लेखी खुलासा करावा. तशी आपल्यालाही (चिपळूण तहसीलदार) खात्री नसेल तर आपण माझ्यासोबत यावे.
त्यामुळे बुडला जाणारा महसूल त्या त्या एरियातील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडून पगारातून वसूल करण्यात यावा असे त्यांनी म्हटले होते.
अनधिकृत नदीतील रेती वाळू उपसणाऱ्यांच्या कारवाई करावी व ताबडतोब बंद करावे. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. याची दखल न घेतल्यामुळे त्यांना आमरण उपोषणाला बसावे लागत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.