अमृत तांबडे / राजापूर:-राजापुरातील प्रसिद्ध गंगाक्षेत्र असलेल्या उन्हाळे येथील गंगेचे पुन्हा आगमन झाले आहे. आज पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान ही गंगेचे आगमन झाल्याचे येथील ग्रामस्थानी सांगितले. गेल्या मार्च 2024 मध्ये गंगा अंतर्धान पावली होती. त्यानंतर बरोबर वर्षांनी या गंगेचे आगमन झाले आहे. येथील बाराही कुंडे भरलेली आहे. होळीच्या मुहूर्तावर गंगेचे आगमन झाल्याचे येथील जाणकार सांगतात. यामुळे आता गंगा दर्शन घेण्यासाठी आणि स्नानासाठी भक्तांचे हळूहळू पावले वळू लागली आहेत.
राजापुरातील उन्हाळे येथे असणाऱ्या गंगातीर्थ क्षेत्री गंगेचं आगमन झालं. गेल्या काही वर्षांमध्ये राजापुरातील गंगेचं आगमन-निर्गमन सातत्याने बदलत असल्याची बाब समोर आली आहे.
कोकणातील शिमगोत्सवाच्या काळात किंवा त्यानंतर गंगामाईचे आगमन किंवा वास्तव्य सुरु राहिल्यास या भागात असणाऱ्या अनेक ग्रामदेवतांच्या पालख्यांची आणि गंगामाईची भेट घडवून आणण्याची प्रथा आहे. यंदाही हे चित्र इथं पाहायला मिळू शकतं.