चिपळूण : शहरातील खेंड गणपती मंदिर परिसरातून ८४ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू असून कोणाला आढळून आल्यास चिपळूण पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रीमती साधना सुंदर कामेरकर (८४, खेंड बावशेवाडी) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे.
याबाबतची खबर त्यांचा मुलगा दिनेश सुंदर कामेरकर (खेंड विठ्ठलवाडी रखुमाई अपार्टमेंट) यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी दिली होती. श्रीमती साधना कामेरकर या त्यांची चुलत बहीण सुनिता कोळवणकर यांना खेंड बावशेवाडी येथील घरी जाते असे सांगून निघून गेल्या होत्या. त्या घरी न परतल्या नाहीत. नातेवाई तसेच आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला असता सापडून आल्या नाहीत. त्यामुळे पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले असून उंची ५ फुट, रंग सावळा, चेहरा उभा, केस तांबडे असे त्यांचे वर्णन आहे. त्या कोणाला सापडून आल्यास चिपळूण पोलीस स्थानक 02355-252333, तपासिक अंमलदार ए. एस. ठाकूर मो. क्र. 9850934977 यांच्याशी संपर्क साधावा.